Uncategorized
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

केज :- दत्तात्रय मुजमुले
तालुक्यातील मौजे सोनेसांगवी येथे साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन सेवाभावी संस्थेच्या वतीने मौजे सोनेसांगवी येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त रविवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणे,भव्य रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे व आरोग्य तपासणी शिबिराचा गावातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन फाउंडेशनचे सचिव ज्ञानेश्वर गिरी यांनी केले आहे.