Uncategorized

पॉक्सो गुन्हा संदर्भात अँड फारूक अन्वरअली शेख यांनी कोर्टात मांडली बाजु

पॉक्सो कायदा प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात रोज अनेक वेगवेगळ्या घटना होत असतात, त्यामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी एक घटना घडल्याचे प्रकरण चिंचवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यासाठी संहिता 2023 बीएनएस म्हणून संबंधित आणि लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण कायदा कलम 4 ,6, 8 ,12 संबंधित आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे राहणारे 42 वर्षीय स्वयंपाकीय रमेश रामसिंग माले (नाव बदल आहे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर बारा वर्षेय पीडितेने आरोप केला होता . चिंचवड पोलीस स्टेशन येथे आरोपीला अटक करण्यात आले होते. त्यानंतर आरोपीने बीएनएस आणि पॉक्सो कायद्यांतर्गत विविध कलमाखाली कथित गुन्ह्यासाठी बीएनएसएसच्या कलम 483 अंतर्गत जामीन अर्ज दाखल केला. सरकारी वकील यांनी या जामीनाच्या अर्जाला विरोध केला होता, यावर आरोपीच्या वकिलांनी बाजू मांडत आरोपीने कोणताही गुन्हा केलेला नाही . तो न्यायालयाच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्यास तयार आहे आणि जामीन मंजूर करण्यासाठी त्यांनी विनंती केली आहे. तपास पूर्ण झाला आहे आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे . सदरील पीडीतेने आरोपी क्रमांक एक सोबत प्रेम संबंध होते आणि ते घरातून पळून जाण्याच्या उद्देशाने निघून गेले होते. आरोपी क्रमांक दोन हा पीडीतेचा संबंधित नातेवाईक असल्याचे दिसून आले. सदर पिडीतेने त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून आरोपीची कधीही न भरून निघणारे नुकसान व नाहक बदनामी केली आहे.
या न्यायालयात मोठ्या प्रमाणात खटले प्रलंबित आहेत खटला स्वतःचा वेळ घेईल अर्जदाराला तुरुंगात ठेऊन कोणताही उद्देश साध्य होणार नाही . कडक अटी घालून आरोपीला सोडता येईल म्हणून तो न्यायालयाच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्यास तयार आहे हे लक्षात घेता काही अटी घालून अर्जदाराला जामीन मंजूर मिळावी आणि अर्जदाराविरुद्ध कोणत्याही ठोस पुरावा नाही ,तपास पूर्ण झाला आहे आणि अर्जदार एक जबाबदार व्यक्ती आहे त्याचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही .अर्जदार त्याच्या कुटुंबाचा एकमेव कमावता आहे आणि पीडीतेचा नातेवाईक आहे त्यामुळे त्याची निर्दोषिता आणखी सिद्ध होते , अर्जदार यांनी कोणत्याही प्रकारे अभियोजन पक्षाच्या पुराव्याशी चर्चा करणार नाही ,तो पीडित माहिती देणारा आणि कुटुंबातील सदस्य साक्षीदारावर दबाव आणणार नाही असे आरोपीचे वकील एडवोकेट फारुक अन्वरअली शेख यांनी युक्तिवाद केला. यावेळी एडवोकेट जुबेर अली ,अडवोकेट विकास शर्मा ,एडवोकेट शिरीन शेख ऍडव्होकेट ऋषिकेश भोसले यांनी कोर्टाचे कामकाज पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!