मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

बीड :- जिल्ह्यातील गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार बहुजन जेष्ठ नागरिक मंच तसेच आझाद क्रांती सेना यांच्या वतीने बीड जिल्ह्या तील मे,जुन २०२५ परीक्षा मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक १० वी तसेच १२ विज्ञान वर्गातील ८० टक्के च्या वर गुण घेऊन विशेष प्राविण्या सह उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जाती,जमाती मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थांचा पंचायत समिती,केज येथे नवीन सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे.गुणवंत विध्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह,संविधानाची प्रत,महापुरुषाचे चरित्र ग्रंथ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते हा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.
तरी गुणवंत विद्यार्थी,पालक,शिक्षक सर्व जेष्ठ कर्मचारी, सेवानिवृत्त,महिला,नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन बाबूराव गालफाडे सर, बहूजन जेष्ठ नागरिक मंच व आझाद क्रांती सेना,पदाधिकारी केज यांच्या वतीने करण्यात आले आहे.