शैक्षणिक

वेदांत प्रायमरी स्कूलच्या नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

केज :- तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेली शाळा म्हणून ओळख असलेल्या वेदांत प्रायमरी स्कूलच्या नवीन शाखेचा केज शहरात मान्यवरांच्या शुभहस्ते शुभारंभ करून उद्घाटन करण्यात आले.

केज शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या वेदांत प्रायमरी स्कूलच्या उद्घाटन प्रसंगी श्रीकृष्ण मठ संस्थानचे ह.भ.प. केशव शास्त्री महाराज, ह.भ.प.मदने महाराज,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, सेवानिवृत्त अभियंता श्री रोडे,नगरसेवक बाळासाहेब गाढवे, नगरसेवक बाळासाहेब जाधव, कृष्णा बँकेचे श्री मुंडे,संस्थेचे संस्थापक सखाराम वनवे उपस्थित होते.

बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेता शैक्षणिक परंपरेला आधुनिक इंग्रजी शिक्षणाची जोड देण्याकरीता संस्थेचे अध्यक्ष सखाराम वणवे यांनी या शाळेची उभारणी केली आहे.तर शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून नवीन पिढी घडविण्याकरीता गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच गुणवत्ता वाढीसाठी पुरेपूर प्रयत्न करावे असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी केले.

यावेळी श्रीमती लांडगे मॅडम, श्रीमती गायकवाड मॅडम, श्रीमती गाते मॅडम, श्रीमती शेख मॅडम,श्रीमती वेदपाठक मॅडम, श्रीमती मस्के ताई, श्री घुले सर श्री धनराज वनवे, रवींद्र सारूक यांच्यासह इतर कर्मचारी माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!