शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून प्रेमलता सूर्यवंशी/देशमुख मॅडम यांची होती ओळख

केज/प्रतिनिधी
सरस्वती कन्या प्रशालेच्या श्रीमती प्रेमलता सूर्यवंशी/देशमुख मॅडम यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न झाला आहे. एक आदर्श शिक्षिका बरोबरच शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून श्रीमती देशमुख मॅडम यांचे काम आहे असे प्रतिपादन प्राचार्या तथा मुख्याध्यापिका सविता घुले मॅडम यांनी केली आहे.
माऊली विद्यापीठांची प्रथम शाखा असलेल्या सरस्वती कन्या प्रशाला केजच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका श्रीमती प्रेमलता वामनराव सूर्यवंशी/ देशमुख यांचा नियत वयोमानानुसार सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरस्वती कन्या प्रशालेच्या प्राचार्या तथा मुख्याध्यापिका सविता घुले मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार तात्या गवळी, पत्रकार वसंत सोनवणे व सौ.मीरा गवळी, श्री मोरे व सौ. मोरेताई यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती म्हणून श्रीमती प्रेमलता देशमुख व श्री माणिकराव देशमुख सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सरस्वती कन्या प्रशालेचे सर्व शिक्षक वृंदांच्या वतीने श्रीमती सूर्यवंशी-देशमुख मॅडम व श्री माणिकराव देशमुख सर यांचा भर पेहराव देऊन शाळेच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सर्वप्रथम सरस्वती कन्या प्रशालेच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले श्रीमती देशमुख मॅडम यांनी त्यांच्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात अध्यापन क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे वर्णन मुलींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पर मनोगत व्यक्त करताना मगर सर म्हणाले की,सेवापूर्ती सोहळा हा का? करतो तर त्यांनी ३१ वर्षे सेवा केली त्या निमित्त हा सोहळा आयोजित केला जात आहे. पुढे बोलताना मगर सर म्हणाले की,बालपणी शिक्षण घ्यायचे असते त्यानंतर नोकरी यामध्ये माणूस हा व्यस्त असतो त्यामुळे कुटुंब व स्वतःकडे पाहण्यास वेळ देता येत नाही. श्रीमती देशमुख मॅडम यांनी यापुढे कुटुंबासाठी व स्वतः करिता निसर्गाच्या सानिध्यात पुढील आयुष्य जगावे असे मत व्यक्त केले आहे. यावेळी श्रीमती डोंगरे मॅडम म्हणाले की,देशमुख मॅडम यांना एखादे काम करायचे असेल तर त्या कोणत्याही पद्धतीने का होईना परंतु ते काम पूर्ण करणारच त्याचबरोबर देशमुख मॅडम म्हणजे शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून व माझ्या उत्कृष्ट एक सहकारी शिक्षिका आहेत विद्यार्थिंनीसह सर्व सहकाऱ्यांना त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. यावेळी शिक्षक वृंद व उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून श्रीमती देशमुख मॅडम यांना शुभेच्छा दिल्या. या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना देशमुख मॅडम भावुक झाल्या गेली ३१ वर्षे ७ महिने १५ दिवस सरस्वती कन्या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थिनींची सेवा करण्याची संधी संस्थेच्या संस्थापक संचालक तथा खासदार रजनीताई पाटील यांनी दिल्याबद्दल त्यांच्या बद्दल श्रीमती देशमुख मॅडम यांनी आपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली. माजी मंत्री श्री अशोकराव दादा पाटील व सचिव आदित्य दादा पाटील यांनीही सेवेत असताना वेळोवेळी खूप मोलाचे सहकार्य केले आणि म्हणूनच मी आत्तापर्यंत शिक्षिकेची चांगली कामगिरी पार पाडून सेवापूर्तीपर्यंत मजल मारू शकले अशा भावना त्यांनी बोलताना व्यक्त केल्या. पुढे बोलताना देशमुख मॅडम म्हणाल्या की, जेव्हा जेव्हा माझ्या सहकाऱ्यांना व मुलींना माझी गरज भासेल तेव्हा मला हाक द्या मी तुमच्या हाकेला ओ म्हणून तुम्हाला नक्कीच साथ देईल असे मत व्यक्त केले. दुसरे सत्कारमूर्ती देशमुख मॅडम यांचे पती माणिकराव देशमुख सर यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, सूर्यवंशी-देशमुख मॅडम यांच्या खाजगी जीवनातील सेवाभावी वृत्ती आणि विद्यार्थ्यांप्रति असलेल्या प्रेमभाव आणि तळमळ या विशेष गुणांवर प्रकाश टाकला. पुढे बोलताना माणिकराव देशमुख सर म्हणाले की, १९९० साली आमचा विवाह झाला आमचा विवाह संपन्न होताच काही दिवसातच माझी पत्नी प्रेमलताचा बीएड साठी उस्मानाबाद येथे नंबर लागला बी.एड केल्यानंतर खासदार रजनीताई पाटील अशोक दादा पाटील यांनी माझ्या पत्नीला शाळेत सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. फणस हा वरून काटेरी असतो पण आत मध्ये गोड गर असतात याच उक्ती प्रमाणे माझी पत्नी गोड स्वभावाची आहे. एखाद्या घरामध्ये आई शिकलेली असली तर मुले शिकून त्यांचे घर पुढे जाते ते उदाहरण म्हणजे माझी पत्नी होय माझ्या मुलांना घडवण्यात माझ्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे असे बोलताना त्यांनी स्पष्ट केले आहे. अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना घुले मॅडम म्हणाल्या की, श्रीमती देशमुख मॅडम यांनी एक आदर्श शिक्षिका बरोबरच शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून शाळेत काम केले आहे आमच्या शाळेच्या मुली घडवण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. देशमुख मॅडम यांनी ज्ञानदान देण्याचे काम केले परंतु त्यासोबत एक आदर्श मैत्रीण म्हणून देखील त्यांनी आमच्या व मुलींसोबत राहण्याचे काम केले आहे. यावेळी नेहरकर मॅडम,लामतुरे मॅडम,इंगळे मॅडम, श्री सुसंगे सर, श्री पवार सर,श्री देशपांडे सर,शुक्ला मॅडम,श्री ढाकणे सर, श्री मोटे सर, श्री कोकाटे सर, श्री रणदिवे सर, श्री टोपे सर, श्री इंगळे सर, श्री यादव सर यांच्यासह सरस्वती कन्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण या दोन्हीही शाखेचे सर्व शिक्षक वृंद व सरस्वती कन्या प्रशालीचे सर्व शिक्षक वृंद पालक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार श्री जोगदंड सर यांनी मानले.सदर कार्यक्रम यशस्वी संपन्न होण्यासाठी सरस्वती कन्या प्रशालेच्या शिक्षक वृंद यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी देशमुख मॅडम यांच्या वतीने सर्व विद्यार्थीनिंना अल्पोपहाराचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.