केजच्या तरुणाची अजब मागणी

केज :- प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असुन २३ तारखेला निकाल जाहीर झाला. त्यामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले. परंतु आठवडा होत आला तरी देखील अद्याप तरी सरकार स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचे देवेंद्र फडणवीस यांना की एकनाथ शिंदे अथवा अजित पवार यांना हा मुद्दा अजुन तरी गुलदस्त्यात आहे.त्यामुळे काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाची मुदत २६ तारखेपर्यंत होती ती सुध्दा संपून गेलेली आहे.
खरतर अश्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होत असते. परंतु तसेही होताना आपल्याला दिसत नाही. या सर्व बाबींचा विचार करून केज मधील पांडुरंग कसबे या तरुणाने महायुतीचे मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पद माझ्याकडे द्या अशी विचारणा मागणी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे केली आहे.