छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार जाहीर

माजलगाव (प्रतिनिधी) :-
महाराष्ट्रात सध्या ज्या संघटनेने आपल निळ वादळ निर्माण केले आहे त्या आझाद क्रांती सेनेचे सेना प्रमुख राजेश जी घोडे यांना आंबेडकरी चळवळीतील योगदानाबद्दल छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
26 जून 2025 रोजी रुबी हॉटेल नवीन नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा पुरस्कार अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स कडून नांदेड येथे देण्यात येणार आहे. झुंजार सेनानी राजेश जी घोडे यांनी आझाद क्रांती सेनेच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी तरुणांची फळी निर्माण करून अन्यायाच्या विरोधात प्रहार करण्याचं काम करतात. या कामाची दखल घेऊनच त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे विविध क्षेत्रातून तअभिनंदन केले जात आहे.