Uncategorized

करंट लागून तरुणाचा मृत्यू

घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील २४ वर्षीय तरुणाला विजेचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी (दि.१३) सकाळी ९ च्या सुमारास घडली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

धनंजय राजाभाऊ जाधव(देशमुख) (वय२४ वर्ष) रा. घाटनांदूर असे मयत तरुणाचे नाव आहे. तो सकाळी शेतात कामासाठी गेला असता ९ च्या दरम्यान शेतातील विद्युत प्रवाह असलेल्या वाहिनीचा जोराचा झटका लागल्याने तो जागीच कोसळला व त्यास स्वामी.रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय,अंबाजोगाई येथे दाखल केले असता तिथे धनंजयला मृत घोषित करण्यात आले.

धनंजय हा गुणी व सर्वांत वावरणाऱ्यापैकी एक हसतमुख चेहरा होता त्याच्यावर काळाने घाला घातला धनंजय याच्यावर अचानक काळाने झडप घातली आहे. तर तो एकुलता एक मुलगा होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!