Uncategorized

कीट्टी आडगाव चे सरपंच रुख्मांगद खेत्रे यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी

केज :- दि.25 (प्रतिनिधी)

दोन दिवसापूर्वी माजलगाव तालुक्यातील कीट्टी आडगाव चे सरपंच रुख्मांगद खेत्रे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून सदरील रक्कम ही सरपंच यांनी सदरील रक्कम ही स्वतःसाठी घेतली नाही तर विहीर मंजुरीसाठी जे अधिकारी पैसे मागतात त्यांना देण्यासाठी घेतली होती यात त्यांचा काहीही दोष नसल्याने त्यांना या गुन्ह्यातून मुक्त करावे अशी मागणी केज तालुका सरपंच परिषदेच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत सविस्तर वृतांत असा की दोन दिवसापूर्वी माजलगाव तालुक्यातील कीट्टी आडगाव चे सरपंच रुख्मांगद खेत्रे यांनी विहीर मंजुरीसाठी लाभार्थी यांचेकडून पैसे घेतल्याचे प्रकरण घडले परंतु हे पैसे सरपंच यांनी स्वतःसाठी घेतले नाहीत तर वरिष्ठ अधिकारी विहीर मंजूर करण्यासाठी 25 ते 30 हजार रु. मागतात मग ही रक्कम सरपंच कोठून देणार सदर लाभार्थी यासाठी ही रक्कम देतात परंतु ही रक्कम सबंधित अधिकारी सरपंच किंवा उपसरपंच किंवा रोजगार सेवक यांच्या माध्यमातून स्वीकारता आणि त्यासाठीच त्यांनी ही रक्कम स्वीकारली यामध्ये वैयक्तिक त्यांची काहीही चूक नसून त्यांना या गुन्ह्यातून मुक्त करण्याची मागणी केज तालुका सरपंच परिषदेच्या वतीने तहसीलदार यांना करण्यात आली आहे. यावेळी तालुक्यातील सर्व सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!