ससुन हॉस्पिटल मधील महाराष्ट्र सुरक्षा बल यांचावर कडक कारवाई करावी – आरोग्य सेवक अमोल लोंढे

ससुन हॉस्पिटल मध्ये महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF ) या सुरक्षा दलाच्या कंपनीचे सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहे. सुरक्षा रक्षकाडुन अंगावर धावून येणे, शिवीगाळ करणे यासारखे प्रकार घडत आहेत. विरोधात या कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट यांच्यावर कार्यवाही करून कारवाई करावी व ही कॉन्ट्रॅक्ट रद्द करावे.
आपल्या हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF ) ही सुरक्षा रक्षक कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट असून या कंपनीचे सुरक्षा रक्षक असलेले कर्मचारी भांगे , झुंजुर्णे व इतर तीन हे कर्मचारी अर्वाच्य भाषेत अरे तुरची भाषा शिवीगाळ व अंगावर धावून येणे अशा प्रकारचे वर्तन सतत करत असतात, चार महिन्यापूर्वी केले होते ही घटना परत चार महिन्यानंतर माझ्यासोबत घडली आहे याच घटनेच्या विरोधात मी चार महिन्यापूर्वी आपल्या ससून हॉस्पिटलमध्ये निवेदन दिले असता या निवेदनावरती कुठलीही पुढील कारवाई झाली नाही तरी वैद्यकीय अध्यक्ष साहेबांनी येथील हा महाराष्ट्र सुरक्षा बल यांचा भोंगळ कारभार याच्यावरती योग्य तो निर्णय घेऊन विचार करून यावरती कडक कारवाई करावी ही नम्र विनंती अन्यथा महाराष्ट्र सुरक्षा बल या प्रायव्हेट कंपनीच्या विरोधात मी आपल्या ससून हॉस्पिटलच्या आवारात आमरण उपोषणाला बसणार आहे पुढच्या परिणामाला सर्वस्वी ससून हॉस्पिटल व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी व त्यांचे मुख्य प्रबंधक हे जबाबदार असतील तरी मेहरबान साहेब आपणास विनंती आहे की आपण ही घटना वारंवार का घडते यावरती परत एकदा सखोल असा अभ्यास करून कार्यवाही करून कारवाई करावी असे आरोग्य सेवक अमोल लोंढे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.
