आत्मा मार्फत गट क्षमता बांधणी प्रशिक्षण संपन्न

केज :- दत्तात्रय मुजमुले
तर प्रा हनुमंत सौदागर यांनी गटाच्या माध्यमातून शेती समृद्ध करणे,लोकांनी सहभाग वाढवून एकत्र येणे, आत्मा गटातून आमच्या मध्ये प्रेरणा निर्माण झाली छत्रपती शेतकरी गटाच्या माध्यमातून आम्ही सेंद्रिय शेती राबवित असल्याचे व विविध सेद्रिय निविष्ठा तयार करीत असून उत्पादन खर्च कमी करीत असल्याचे बोलताना सांगितले. दर महिना एकत्र येऊन बैठक घेऊन शेतकरी यांनी नियोजन करून शेती हा व्यवसाय करणे आवश्यक आहे, शेतीपूरक व्यवसाय गटाच्या माध्यमातून करणे सोपे होते असे सांगितले. तसेच विनोद ठोबरे यांनी सोयाबीन डिजिटल शेतीशाळा व दुग्ध उत्पादन शेतीशाळा याविषयीं मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार योगेश पाटील बी टी एम आत्मा यांनी केले.
यावेळी धनेगावचे सरपंच आदेश गुजर,सागर पठाडे तालुका कृषि अधिकारी केज, प्रा हनुमंत सौदागर, विनोद ठोंबरे, प्रदीप भारगजे, प्रवीण खोडसे तालुकाअध्यक्ष कॉग्रेस, धनेगावचे कृषि सहाय्यक गणेश पारखे, कमलाकर राऊत, उमेश माळी,राहुल खोडसे संभाजी ब्रिगेड, मनोराम पवार, दत्तात्रय मुजमुले, अमोल गोरे, अशोक कसपटे, निखिल शिंदे, परमेश्वर मुळे, विकास पाटील, सूर्यभान मुळे, दयानंद गुजर सुनील गुजर, नवनाथ कापसे इतर बहूसंख्य शेतकरी उपस्थित होते.