सूरज निकाळजे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

अंबाजोगाई :- दत्तात्रय मुजमुले
राजकारण किंवा समाजकारण म्हटलं की कोणीतरी आपल प्रेरणास्थान असतं.अनेक जण अनेक व्यक्तींचे चाहते असतात तर आपापल्या नेत्यांचे ते एकनिष्ठ ही असतात.असेच हजारो लाखो जनसमुदाय आंबेडकर घराण्यावर प्रेम करणारा त्यांचा आदर करणारा आहे. त्यात तरुणांचे प्रमाणही तेवढेच आहे. असाच एक निस्वार्थी आणि आंबेडकर घराण्यावर निष्ठा असणारा घराण्याचे एकनिष्ठ तरुण म्हणजे सूरज भैया निकाळजे.तरुणांचे,वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा तरुण,आंबेडकरी चळवळ पुढे घेऊन जाण्यात आपलं योगदान देणारा विद्यार्थी नेता म्हणजे सूरज भैया निकाळजे.
त्यांचा 16 ऑगस्ट रोजी वाढदिवस मित्रपरिवाराच्या वतीने अंबाजोगाई तालुक्यातील त्याच बरोबर माजलगाव तालुक्यातील मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.अंबाजोगाई शहरातील शिक्षणाच्या माध्यमातून वास्तव्य केल्याने आणि आपली कर्मभूमी समजून येथील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपड करत असल्याने येथे त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष तरुण तडफदार व्यक्तिमत्व अजयजी गोरे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने अंबाजोगाई येथील शासकीय विश्रमगृहावर त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.त्यावेळी विविध क्षेत्रातील मंडळींची उपस्थिती होती.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष अजयजी गोरे,आंबेडकरी चळवळीतील सक्रिय युवा नेतृत्व विजयकुमार गायकवाड,अभ्यासू व्यक्तिमत्व उत्कर्ष वेडे,विशाल मस्के,संदीप मस्के,संपादक तथा युवा पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांच्यासह इतर मित्र परिवार उपस्थित होते.