Uncategorized

१ मे महाराष्ट्र दिनी मानवी साखळीतून मतदान जनजागृती

केज :- दत्तात्रय मुजमुले प्रतिनिधी

दिनांक १ मे महाराष्ट्र दिन रोजी तसीलदार अभिजित जगताप यांच्या हस्ते ध्वाजारोहन करून तहसील कार्यालय केज येथे सहाय्यक निवडणूक अधिकारी दिपक वंजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती अभियान (SVEEP )कक्षा अंतर्गत मानवी साखळी करून मतदानासाठी मतदारांना प्रेरित केले.यासाठी विद्यार्थी व पालकांतून प्रतिसाद चांगला मिळाला.

यावेळी तहसीलदार जगताप म्हणाले,की, ‘निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार वापरणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. यंदाच्या लोकसभेसाठी आपल्या जिल्ह्यात १३ मे रोजी मतदान होत आहे. देशाच्या भविष्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे.तर तसेच गटशिक्षणाधिकारी बेडस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती अभियानांतर्गत मानवी साखळी तयार करून १३ मे हा मराठी शब्द तयार केला. यात ८९६ विद्यार्थी व ७३२ पालक,शिक्षक कार्यालयीन कर्मचारी सहभागी झाले.यावेळी मतदान जनजागृती साठी 13 मे घोषणा पथनाट्याचे आयोजनही केले होते. तसेच शहरातून रॅली काढण्‍यात आली.त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सदर कार्यक्रमास व रॅलीस सरस्वती कन्या प्रशाला केज, वि.दा. कराड वि. केज, सानेगुरुजी निवासी प्रा.वि. केज, स्वामी विवेकानंद वि. केज, या शाळेतील विद्यार्थी,शिक्षक,पालक,व नागरिक आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!