Uncategorized

शासकीय नौकरीत सामावून घेण्याची मागणी

बीड दि.२ (प्रतिनिधी) :- मातंग आरक्षण वर्गीकरण हुतात्मा शहीद संजय ताकतोडे यांच्या कुटुंबीयांनी, कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे यामागणीसाठी मंगळवार (दि.२) रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

मातंग समाज आरक्षण वर्गीकरण हुतात्मा शहिद संजय ज्ञानोबा ताकतोडे यांनी दि.05/03/2019 रोजी मातंग समाजाला अ,ब, क,ड वर्गवारी नुसार स्वतंत्र आरक्षण दण्यात यावे या मागणीसाठी बीड तालुक्यातील बिंदुसरा प्रकल्पात जलसमाधी घेतली होती. त्यानंतर सकल मातंग समाजाच्या वतीने, विविध मागण्या शासनाकडून मान्य करण्यात याव्या याकरिता शहीद संजय ज्ञानोबा ताकतोडे याच्या पार्थिवावर, जोपर्यंत शासन स्तरावरुन केलेल्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाहीत अशी भूमीका घेत ठिय्या आंदोलन केले होते.

सदरील मागण्यांमध्ये प्रामुख्याने शहीद संजय ज्ञानोबा ताकतोडे यांच्या कुटुंबातील एका सदस्यास शासकाय नौकरी देवुन पुनर्वसन करावे या मागणीचा प्रामुख्याने समावेश होता. तद्नंतर तात्कालीन मा.मुख्यमंत्री, मा. पालकमंत्री यांच्याकडून मा. जिल्हाधिकारी बीड यांचे मार्फत आमच्या मागण्या मान्य केल्या जातील असे लेखी स्वरुपात आश्वासीत करण्यात आले होते. परंतु आजतायगत शहीद संजय ताकतोडे यांच्या कुटुंबातील सदस्यास शासकीय नोकरीत सामावुन घेतले नाही अथवा याबाबत कसलीही कार्यवाही झाली नाही.

त्यामुळे शहिद संजय ताकतोडे यांचे आई-वडील सौ.फुलाबाई ज्ञानोबा ताकतोडे व ज्ञानोबा ताकतोडे हे मंगळवारी (दि.२) रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!