Uncategorized

पुरोहित कल्याणसमिती च्या प्रदेश अध्यक्षपदाची निवड जाहीर

केज/प्रतिनिधी

समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती च्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक आंदोलने व उपक्रम राबविण्यात आली आहेत त्यामुळे महाराष्ट्रात अमृत सारखी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये सहकार्य होत आहे तसेच परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजासाठी निर्माण करण्यात आले. या आंदोलनात नेहमी अग्रेसर असणारे श्रीनिवास केजकर यांची समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती च्या पुरोहित कल्याण समितीच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीही ब्राह्मण समाजातील वेगवेगळ्या समस्यावर मागील 10 ते 12 वर्षांपासून काम करत आली आहे. ब्राह्मण समाजातील पुरोहित बांधवांच्या समस्या सोडविण्या साठी व पुरोहितांसाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून काम करण्यासाठी श्रीनिवास केजकर यांची निवड करण्यात आली आहे. संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यात संघटनात्मक बांधणी करत असून लवकरच राज्य विभाग जिल्ह्यात व तालुका पातळीवरच्या नियुक्ती करून सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे संस्थापक धनंजय कुलकर्णी, श्रीकांत जोशी,ईश्वर दीक्षित यांनी सांगितले.

दरम्यान श्रीनिवास केजकर यांच्या निवडी चे पत्र ब्राह्मण संघर्ष समितीचे संस्थापक धनंजय कुलकर्णी, अनंत देवा कोकिळ, श्रीधर नाना खोत, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे.त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!