खा.सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राज्य प्रमुख पंडित कांबळे यांनी दिले नियुक्तीपत्र

अंबाजोगाई:- तालुक्यातील मौजे शेपवाडीचे भूमिपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे निष्ठावंत शिलेदार अंकुशराव ढोबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग प्रदेश सराचटणीस या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांच्या विचारांवर प्रेरित होऊन गेल्या पंचवीस वर्षांपासून शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेले प्रामाणिक नेतृत्व म्हणजे अंकुशराव ढोबळे आहेत.त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजवर दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख पंडित कांबळे यांनी अंकुशराव ढोबळे यांची महाराष्ट्र प्रदेश सरचटणीस पदावर नियुक्ती केली आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्याचे व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य त्यांच्यावर सोपवले आहे.
अंकुशराव ढोबळे हे शेपवडीचे सरपंच होते.तर सध्या संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य आहेत.त्यामुळे त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.त्यांच्या महाराष्ट्र प्रदेश सरचटणीस पदी झालेल्या निवडीबद्दल मित्रपरिवार व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.