Uncategorized

*अतिरिक्त ऊसाला हेक्टरी 1 लाखाची मदत करण्याची उपमुख्यमंत्र्याकडे शेकापची मागणी*

*अतिरिक्त ऊसाला हेक्टरी 1 लाखाची मदत करण्याची उपमुख्यमंत्र्याकडे शेकापची मागणी*

*ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजुने उभे राहु -भाई मोहन गुंड*

केज (दत्तात्रय मुजमुले प्रतिनिधी )

बीड जिल्ह्यात दोन वर्षात चांगला पाऊस झाल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड झाली, जिल्ह्यातील अतिरिक्त ऊस प्रश्न निर्माण झाला आहे ज्या शेतकर्यांचा ऊस गाळप होणार नाही आशा शेतातील उभ्या ऊसाला हेक्टरी 1 लाख मदत करावी अशी मागणी शेकापचे भाई मोहन गुंड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकार्यांना मदत न झाल्यास बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढतील अशी परिस्थिती निर्माण झालेली अहे, बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्ह्यातील उभ्या ऊसाला हेक्‍टरी एक लाख रुपयांची मदत करावी,मागील तीन वर्षाचे शेती पंपाचे वीज बिल माफ करावे,सन 2020 मधील रब्बी व खरीप हंगामातील पीक विम्याचे वाटप करण्यात यावे अशा मगणीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांना शेकापचे भाई मोहन गुंड,अशोक रोडे, अॅड निखल बचुटे, मंगेश देशमुख,महेश गायकवाड,राज तपसे इतर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!