सारिकाताई पवार यांनी केला साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा

(पुर्णानगर) माजी मंत्री एकनाथराव खडसे साहेब यांची मानसकन्या व पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी महिला शहर अध्यक्षा सौ. सारिका ताई पवार यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला चिंचवड विधानसभेचे आमदार मा.लक्ष्मण भाऊ जगताप यांची प्रकृती अस्वस्थ असल्याकारणामुळे वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय एकता महिला मंचच्या वतीने घेतला वाढदिवसानिमित्त कोणताही प्रकारचा गाजावाजा न करता साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला त्यांनी शुभेच्छा फोन मेसेज द्वारे व प्रत्यक्ष स्वीकारल्या.
स्टार 24 न्युज मराठी शी बोलताना पवार म्हणाल्या कि सर्व कार्यकर्त्यांना सांगितले होते की कोणत्याही प्रकारचे फ्लेक्स किंवा कार्यक्रमाचे आयोजन करू नका. चिंचवड विधानसभेचे आमदार जगताप यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मी वाढदिवस साजरा करणार नाही ,मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असले तरी, त्यांचे व आमचे ऋणानुबंध आहेत वाढदिवस उत्साहात साजरा करणे उचित नाही, लवकर भाऊची प्रकृती सुधारावी व मला शुभेच्छा रुपी आशीर्वाद देणारे सर्व ज्येष्ठ नागरिक ,युवा, महिला, पत्रकार,मैत्रिणी ,सामाजिक राजकीय ,शैक्षणिक ,क्षेत्रातील सर्व मान्यवरांचे आभार