क्रीडा

तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी सहभाग नोंदवा:-,प्रा.डॉ.कविता गीत्ते

केज :- प्रतिनिधी

युवा कार्य एवं खेल मंत्रालय, भारत सरकार नेहरू युवा केंद्र बीड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड,बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज यांच्या संयुक्त विद्यमाने केज तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2024-25 आयोजन करण्यात आले आहे.

केज तालुक्यातील वय वर्ष 15 ते 29 वयोगटातील युवक सांघिक व वैयक्तिक खेळात सहभागी होऊ शकतात तरी इच्छुक खेळाडू/ युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.स्पर्धेतील प्रत्येक सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र व प्रथम, द्वितीय, तृतीय प्राविण्य प्राप्त संघास/ खेळाडूस प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह क्रीडा मंत्रालयाद्वारे देण्यात येईल.तरी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील युवकांनी सहभाग नोंदवावा स्पर्धा प्रकार- पुरुष (युवक) कबड्डी,गोळा फेक, 100 मीटर धावणे.महिला (युवती) खो-खो,गोळा फेक,100 मीटर धावणे वयाची अट- वय वर्ष 15 ते 29 सहभाग कोण घेऊ शकेल- शालेय,महाविद्यालयीन,तसेच बाहेरील खेळाडू.केज तालुक्यातील खेळाडूंनी नोंदणी दिनांक 08/01/2025 पर्यंत खालील क्रमांकावर करावी.9922536373 श्री विनोद गुंड क्रीडा संयोजक केज,9665374379 श्री सानप सर क्रीडा शिक्षकस्पर्धा ठिकाण- साने गुरुजी निवासी विद्यालय धारूर रोड केज.

केज तालुक्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन अरुण कोचुरे मॅडम नेहरू युवा केंद्र युवा कार्य एवम खेल मंत्रालय भारत सरकार,प्रा.डॉ.कविता गीत्ते, विनोद गुंड क्रीडा संयोजक केज यांनी केले आहे.

चौकट :- नाव नोंदणी करताना खेळाडूंनी आधार कार्ड व जन्मतारखेचा पुरावा देणे आवश्यक आहे.स्पर्धा दिनांक: 09/01/2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!