शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वांचीतचे रास्ता रोको आंदोलन

केज – दत्तात्रय मुजमुले
केज तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजार रुपयांची मदत द्यावी, एक महिन्याच्या पावसाच्या खंडामुळे २५ टक्के अग्रीम पीकविमा लागू करावा, पीककर्ज माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांसह मजुरांचे लाईट बिल माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना १२ तास विद्युत पुरवठा करण्यात यावा, गायरान धारकांचे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून गायरान जमीन वाटप करावी, साळेगांव येथील विद्युत उपकेंद्रावर जोडलेले अतिरिक्त भार कमी करावा या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी (दि. १) सकाळी केज – कळंब रस्त्यावर साळेगाव येथे अर्धा तासाहून अधिक वेळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तर शेतकरी सोयाबीनचे वाळलेले पीक रस्त्यावर टाकून गुरे घेऊन हे आंदोलनात सहभागी झाले होते. रास्ता रोको आंदोलनात वंचीत बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबुराव मस्के, महासचिव अक्षय भुंबे, जिल्हा सचिव लक्ष्मण ओव्हाळ, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के, किरण हजारे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, रास्ता रोको आंदोलन अर्धा तासाहून अधिक काळ झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.