Uncategorized

जालना जिल्ह्यातील लाठी हल्ल्याचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरुवात

केज :- दत्तात्रय मुजमुले

जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलन कर्त्यांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने लाठी हल्ला करण्यात आला.त्यामध्ये महिला,तरुण प्रौढ व्यक्तींवर लाठी हल्ला झाल्याने अनेक आंदोलन कर्ते जखमी झाले आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आग्रही भूमिका घेत आहे.मात्र शासन मराठा आरक्षणावर उदासीन आहे.अनेक ठिकाणी आंदोलन होत असतात मात्र जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर लाठी हल्ला झाला आणि त्याचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरुवात झाली आहे. केज तालुक्यातील सा.पैठण येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने लाठी हल्ल्याचा मौजे पैठण गाव बंद ठेऊन टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!