मांजरा धरणाचे छावा संघटनेकडून जलपूजन..

केज :- दत्तात्रय मुजमुले
केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्प सलग तिसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरले होते.मांजरा धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता आजवर धरणाचे दरवाजे उघडुन पाण्याचा विसर्ग सुरू आहे मात्र आता पावसाळा संपलेला असून आठवड्याभरापासून पाऊस पडलेला नाही व धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झालेलीच असून यापुढे धरणात जास्तीचे पाणी येण्याची शक्यता कमी आहे.त्यामुळे छावा संघटनेच्या वतीने जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांच्या हस्ते मांजरा धरणाचे जलपूजन कार्यक्रम करण्यात आला.
बीड जिल्ह्यासह लातूर, धाराशिवसह अनेक गावांची तहान भागवणारे आणि शेतकऱ्यांची जलवाहिनी म्हणून मांजरा धरणाची ओळख आहे.अशा या धरणावर दिवसरात्र झटणारे करणारे कर्मचारी यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचा सत्कार करून यशस्वी कार्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे,मांजरा विकास सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण खोडसे,मांजरा धरणाचे प्रकल्पाचे लेखापाल विकास ठोंबरे, कालवा निरीक्षक वाघमारे,सेवक सुनील पोटभरे,पोलीस कर्मचारी कांबळे,कंत्राटी कर्मचारी सिद्धार्थ पोटभरे,परमेश्वर गुजर,गजानन गुजर,राहुल इनकर व इतर उपस्थित होते.