Uncategorized

नाव्होली येथील तरुण बेपत्ता!

वेड्याच्या भरात घरातुन निघुन गेल्याने केज पोलीसात तक्रार

केज :- प्रतिनिधी

गेल्या बऱ्याच दिवसापासून मानसिक रुग्न असलेला नाव्होली येथील तरुण शुक्रवार दि. २५ नोहेंबर २०२२ रोजी घरात कोणालाही न सांगता सांयकाळी ६ ते ७ च्या दरम्यान नाव्होली येथुन केज नांदूरघाट रस्त्याने पाई चालत नाव्होली कडुन केज रोडने गेला आहे. गेल्या दोन दिवसापासून त्याचा सर्वत्र शोध घेतला जात असून अद्याप त्याचा तपास न लागल्यामुळे त्याचे मामा मारुती आंधळे यांनी केज पोलिसात तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी कि नाव्होली येथील तरुण दत्तात्रय सुदाम बिक्कड वय ३० वर्षे हा तरुण सुशिक्षित असुन तो अत्यंत हुशार आहे. परंतु तो बऱ्याच दिवसापासून मनोरुग्ण झाला असुन या मनोरुग्न असलेल्या दत्तात्रय सुदाम बिक्कड याच्यावर बार्शी येथील दवाखान्यात उपचार सुरु आहेत. या संदर्भात बेपत्ता तरुण दत्तात्रय सुदाम बिक्कड याचे नात्याने सख्खे मामा मारुती गोविंदराव आंधळे यांनी केज पोलिसात तक्रार दिली असुन त्यात म्हटले आहे. की तक्रारदार मारुती गोविंदराव आंधळे हे बिड तालुक्यातील नेकनुर जवळील रहिवासी असुन त्यांना अमल आणि सत्यभामा अशा दोन बहिनी आहेत. त्यापैकी सत्यभामा हिला केज तालुक्यातील नाव्होली येथे दिले असुन त्यांना एकुलता एक मुलगा नामे दत्तात्रय सुदाम बिक्कड वय ३० वर्षे आहे. तो मनोरुग्न असुन त्याचेवर बार्शी येथे विलाज सुरु आहे. त्याच्या घरी आई वडील अत्यंत थकलेले असुन वडील अपंग आहेत. घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची व हलाखीची आहे. तो घरातून निघुन गेल्यापासून त्याच्या वडिल अंथरूणावर पडुन आहेत.

बेपत्ता दत्तात्रय हा दि. २५ नोहेंबर २०२२ शुक्रवार रोजी सांयकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास तो घरात कोणालाही न सांगता केज नांदूरघाट राज्यमार्गावरुन नाव्होली कडुन केजकडे जाणाऱ्या रसत्यांनी केजच्या दिशेने वेड्याच्या लहरित निघुन गेला आहे. तो गावातील बऱ्याच जणांना दिसला परंतु हा घरातुन निघून गेला आहे.असे कोणाच्या लक्षात आले नाही. परंतु एका व्यक्तीने त्याला पाहुन त्याच्या घरी फोन करुन सांगतले असता त्याची आई व नातेवाईक हे बोरगाव चौफळ्यावरुन उ.पिंप्री कडे गेले आणि हा सरळ चिंचोलीफाटा या दिशेने गेला चिंचोलीच्या शिवावरील धाब्याजवळ जाताच त्याने त्याच्या जवळील मोबाईल, हातातील दोऱ्या, गळ्यातील माळा काढून टाकुन दिले व निघुन गेला. हा मोबाईल त्या ढाब्यावरील एका महिलेला सापडला त्यावरून तिने दत्तात्रय याच्या घरच्यांशी संपर्क साधुन तुमचा मोबाईल येथे सापडला असल्याचे सांगितले तिथुनपुढे पुढिल तपास तिव्र गतीने केला तरी तो अद्यापही मिळुन आला नसल्याने त्याचे मामा मारुती गोविंदराव आंधळे यांनी दि. २७ नोहेंबर रविवार रोजी सांयकाळी ७:०० वा. स्वतः केज पोलिस स्टेशनला हजर होवुन नाव्होली येथील दत्तात्रय सुदाम बिक्कड वय ३०वर्षे हा मनोरुग्ण तरुण बेपत्ता झाला असल्याची तक्रार दाखल केली असुन त्याबाबतचा तपास पो.नि. मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली मेसे हे करत असुन दिलेल्या तक्रारीतुन म्हटले आहे की बेपत्ता तरुण हा घरातुन निघुन गेला असुन त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे.

रंग गोरा, उंची साडेपाच फुट, त्याच्या अंगात हाफ काळ्या रंगाची बनियान व काळी पँट घातलेली असुन त्याच्या पायात चप्पल नाही.त्याला देव, धर्माची जास्त आवड असल्याने तो धार्मिक ठिकाणी असण्याची शक्यता त्यांच्या आई वडील व नातेवाईक यांनी कळवले आहे. तर तो केज तालुक्यातील अथवा इतर ठिकाणच्या धार्मिक ठिकाणी विशेष करुन त्याला दत्तात्रयाची जास्त भक्ती करण्याची जास्त आवड आहे.

तो याच धार्मिक स्थळाजवळ असण्याची शक्यता असल्याने कोणाला दिसल्यास अथवा सापडल्यास केज पोलिसस्टेशनशी संपर्क साधावा अथवा खालील क्रमांकावर संपर्क साधावा…संपर्क नंबर. ९०९६०३८६७९ , ७७४१९७१९१९,९१४५५४५८४५ (पत्रकार महादेव काळे)सोबत फोटो..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!