Uncategorized

वीस हजाराची लाच घेताना कोतवाल जेरबंद; केज तहसीलची अब्रू चव्हाट्यावर

केज : रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रूपयांची लाच घेताना केजमधील कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तसेच केजचा तहसीलदार अभिजित जगताप हे देखील यात आरोपी असून ते फरार झाले आहे. ही कारवाई धाराशिव येथील पथकाने शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास केली. लाचखोरीचे सत्र सूरूच आहे. अभिजीत जगताप हे केजचे तहसीलदार आहे. मच्छिंद्र माने हा केज तहसिल येथे कोतवाल असून जगताप यांच्यासाठी वसूलीचे काम करत आसल्याचे विश्वसनिय माहिती समोर येत आहे. केज तालुक्यातीलच एका रेशन दुकानदारावर कारवाई प्रस्तावित होती. ती न करण्यासाठी तहसीलदार पाटील याने २० हजाराची लाच मागितली होती. हीच लाच कोतवाल माने याने स्विकारली. परंतू तहसीलदार जगताप हे फरार झाले आहे. धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आठवड्यातील दुसरी कारवाई बीड जिल्ह्यात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!