मराठा-बहुजन समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

केज : – प्रतिनिधी
अंतरवाली सराटी येथे गेली सहा दिवस सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील आणि इतर कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ गुरुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा-बहुजन समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाच्या आरक्षण व इतर समस्यां सोडवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारी रोजी आमरण उपोषण सुरू केले होते. सहाव्या दिवशी जरांगे पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. सहाव्या दिवसापर्यंत शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन चर्चा केली नाही. महाराष्ट शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन तात्काळ मागण्या मान्य कराव्यात यासाठी केज तालुका सकल मराठा-बहुजन समाजाच्या वतीने येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर केज तहासिलच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारले व याबाबत वरिष्ठ पातळीवर कळवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे प्रातिनिधिक आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी केज पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
आंदोलनात दिलीप गुलभिले, हनुमंत भोसले, विनोद शिंदे, शिवाजी ठोंबरे, प्रशांत गुंड, मंगेश देशमुख, राहुल खोडसे, अविनाश इंगळे, हनुमंत घाडगे, बाळासाहेब गलांडे, राधाताई रामदास सपकाळ-तपसे, सौ निर्मला नवनाथ सातपुते, संजना जोगदंड,सौ कदम, सौ लक्ष्मी भोसले, नवनाथ देशमुख, सूर्यकांत चवरे, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.