सामाजिक

केज येथे झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीची स्थापना

केज :- प्रतिनिधी

सरकारी जमिनीवरील घराखालील जागेचे अतिक्रमण कायम करून त्यांना नागरी सुविधा तसेच विविध सरकारी योजनेचा लाभ मिळावा यासाठी केज येथे बहुजन चळवळीतील नेते बाबुराव गालफाडे यांच्या निवासस्थानी आज दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी व्यापक बैठक घेण्यात आली. झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष कडूदास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीसाठी केज शहरातील बाबुराव गालफाडे,  विनायक लोंढे,  भिमराव हजारे, महादेव लांडगे,  सोमनाथ राऊत, शरद कांबळे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

केज नगर परिषदेच्या हद्दीमध्ये अनेक झोपडपट्ट्या मधून सरकारी जमिनीवर अनेक गोरगरीब कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण करून राहत आहेत. अतिक्रमित झोपडपट्टी धारकांकडे सरकारी जमिनीवरील घराखालील जागेचे मालकी हक्क / हक्क विलेख नसल्यामुळे त्यांना रमाई घरकुल, पंतप्रधान आवास योजना, शबरी घरकुल योजना अशा विविध योजनेचा लाभ घेता येत नाही. सरकारी जागेवरील झोपडपट्टीची अतिक्रमणे कायम करण्याच्या संदर्भाने महाराष्ट्र शासनाने अनेक वेळा झोपडपट्टी धारकांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. परंतु प्रशासकीय उदासीनता आणि प्रस्थापित राजकीय लोकांचे असलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे झोपडपट्टी वासियांना त्यांचे अधिकार मिळालेले नाहीत.

झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष कडूदास कांबळे यांनी मागील अनेक वर्षापासून सरकारी जागेवरील अतिक्रमणे कायम करून झोपडपट्टी वासियांना त्यांचे मालकी हक्क मिळण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या प्रयत्नाला यशही मिळाले आहे. म्हणून केज शहरातील बहुजन चळवळीत अग्रेसर असलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आज व्यापक बैठक घेऊन पुढील कार्यवाहीची दिशा ठरवण्यात आली. केज शहरातील सर्व अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण कायम करण्याच्या संदर्भातील प्रस्ताव तयार करून दाखल करण्याचे यावेळी ठरवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!