मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

केज/प्रतिनिधी
केज येथे सकल मातंग समाजाच्या वतीने मातंग समाजाच्या विवीध मागण्या साठी केजचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनुसूचित जातींचे उपवर्गिकरण व क्रांतिवीर लहुजी साळवेआयोगाच्या शिफारशींची अंमल बजावणी करण्यासंदर्भात केजचे तहसिलदार राकेश गीड्डे यांना निवदेन देण्यात आले. सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य शाखा केज यांच्या वतीने तहसिलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला होता याचे औचित्य साधुन अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गिकरणासाठी, न्याय हक्कासाठी दि. २० मार्च २०२५ रोजी निवेदन देण्यात आले. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या दि.०१ आगस्ट २०२४ निर्णयानुसार, अनुसूचित जातीच्या आरक्षण उप वर्गिकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या ६८शिफारशींवर आर्थिक तरतूद करुन तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. याकरिता मातंग समाजाच्या मागण्याचे निवेदन केज तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी हानुमंत ताकतोडे, रमेश पाटोळे, प्रा. बन्सी पाटोळे, सचिन गालफाडे, विठ्ठल वैरागे, आनिल जोगदंड, वैजनाथ गालफाडे, तानाजी पौळ या सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.