समाजसेवक अमोल लोंढे (शिरपूरकर) यांना महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार -2025 सन्मानित

पिंपरी चिंचवड :- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदुत संघटना, लॉयन्स अग्रेसन क्लब डॉ. आदित्य पतकराव यूथ फाउंडेशन ,पोलिस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण सेना, ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लामेंट कमिटी भारतीय महाक्रांती सेना, क्राईम प्रिवेंशन अॅन्टी करप्शन कमिटी, छत्रपती शेतकरी सेना, युवा महाराष्ट्र फाउंडेशन, मानव परिवर्तन विकास व बहू उद्देशीय सेवा भावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान सोहळा आज पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी मा.श्री. डॉ. अविनाश ध. सकुंडे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष (आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना),संस्थापक: पोलीस मित्र माहिती अधिकार पत्रकार संरक्षण सेना
मा.श्री. डॉ. आदित्य पतकराव
अध्यक्ष : युवा युथ फाऊंडेशन सहानार सदस्य दुर संचार मंत्रालय भारत सरकार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समाजसेवक अमोल लोंढे (शिरपूरकर) याना महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार -2025 हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.