केज शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पुरोगामी पत्रकार संघाची विस्तारित कार्यकारिणी जाहीर

केज शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पुरोगामी पत्रकार संघाची विस्तारित कार्यकारिणी जाहीर
केज शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ बुधवार रोजी राष्ट्रीय पुरोगामी संघाचे प्रदेशाध्यक्ष विजयजी वाव्हळ सर, राज्य उपाध्यक्ष प्रा.दसरथ रोडे सर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय पत्रकार संघाच्या राज्य कार्याध्यक्ष मनिषा ताई घुले यांच्या मार्गदर्शनाखाली व पुरोगामी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष रंजीत घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली विस्तार कार्यकारिणी जाहीर करण्यात आली
यामध्ये हनुमंत गव्हाणे व दिनकर जाधव यांची उपाध्यक्ष पदी अमोल सावंत यांची संघटक पदी जयद्रत गायकवाड यांची सहसचिव पदी लक्ष्मण हजारे यांनी कोषाध्यक्ष पदी तर महादेव जोगदंड यांची सदस्य पदी निवड करण्यात आली.सर्व पदाधिकाऱ्यांना पुरोगामी पत्रकार संघाच्या राज्य कार्याध्यक्षा मनिषा ताई घुले व नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष रंजीत घाडगे व नवनिर्वाचित सचिव अनिल बापू वैरागे , नवनिर्वाचित तालुका कार्याध्यक्ष नवनाथ पौळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले तसेच सर्वांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या
या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.