माळेगाव ते लोखंडी सावरगाव रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

माळेगाव ते लोखंडी सावरगाव रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन
बोरीसावरगाव च्या सरपंचांची निवेनाव्दारे मागणी
केज:- दत्तात्रय मुजमुले
तालुक्यातील माळेगाव ते बोरीसावरगाव मार्गे लोखंडी सावरगाव हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी अवस्था या रोडची झालेली आहे.माळेगाव ते लोखंडी सावरगाव हा रस्ता रहदारीचा रस्ता आहे.यावरून वाहनांची मोठी वर्दळ असते.आणि हा मार्ग मुख्य मार्ग आहे.या खराब झालेल्या रस्त्याचे काम तात्काळ आणि दर्जेदार होण्यासाठी रस्ते विकास व जहाजबांधणी तथा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना बोरीसावरगाव च्या सरपंच प्रज्ञा सुनिल देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे. माळेगाव ते लोखंडी सावरगाव रस्ता खूप खराब झाला असून प्रवास करण्याजोगा राहिलेला नाहीये त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे तसेच दररोज ये जा करणाऱ्यांना मणक्याचे आजार होत आहे.तर याचबरोबर या मार्गाने श्री संत गजानन महाराज शेगाव यांची दिंडी पंढरपूरला जाण्यासाठी हाच मार्ग असून याचे काम दर्जेदार होणे गरजेचे आहे त्यासाठी मंत्रीमहोदयांनी स्वतः लक्ष देऊन सदरील मार्गाचे काम लवकरात लवकर दर्जेदार करण्यात यावे यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे.निवेदनाबरोबर ग्रामपंचायत बोरीसावरगाव यांनी हा रस्ता होण्यासाठी ठराव घेतला आहे घेतला आहे त्याची एक प्रत निवेदनासोबत जोडली आहे.याअगोदर ही रस्ता दुरुस्तीसाठी व नवीन होण्याकरिता विविध संघटनेच्या वतीने वारंवार आंदोलन मोर्चेही काढण्यात आलेले आहेत.