Uncategorized

बजरंग सोनवणेंच्या वक्तव्याचा विपर्यास केला : सुरज खोडसे

बजरंग सोनवणेंच्या वक्तव्याचा विपर्यास केला : सुरज खोडसे

केज:- दत्तात्रय मुजमुले

दि.12 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या निवडणूक न लढवण्याबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. त्यांनी स्वतः कदाचित जिल्हा परिषद निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केलेले असताना, त्यांच्यासह कुटुंबातील कोणीही सदस्य निवडणूक लढवणार नसल्याचे संभ्रम निर्माण करणारे वृत्त समोर आले, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सुरज खोडसे यांनी केले आहे.सुरज खोडसे यांनी पत्रकात म्हटले आहे की, वाघेबाभुळगाव (ता.केज) येथे विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमास बजरंग सोनवणे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. त्यांनी भाषणात म्हटले की, आपल्या भागातील विकासासाठी मी कटिबद्ध आहे. माझ्या पदांचा कार्यकाळ दीड महिन्यांचा राहिला आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासक येईल. “कदाचित यानंतरच्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात आपण स्वतः असणार नाही. पण, माझे कार्यकर्ते नक्की असतील.” असे विधान त्यांनी केले. माझी एक जागा रिकामी होत असल्याने त्याठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल. आणि तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या जागा निवडून आणण्याची आपली तयारी आहे, असेही बजरंग सोनवणे यांनी म्हटले होते. परंतु, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य निवडणूक लढवणार नाही असे सांगण्यात येत आहे; जे चुकीचे आहे. परंतु, त्यांनी स्वतः निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना भेटून करणार आहेत, असेही राष्ट्रवादीचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सुरज खोडसे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!