Uncategorized

जेष्ठ नेते दिलीप (दादा) भिसे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

केज :- दत्तात्रय मुजमुले

मांजरा पट्ट्यातील अत्यंत अभ्यासू ,राजकारणाचे गाढे अभ्यासक भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप (दादा) भिसे यांचा ६९ वां वाढदिवस मित्रपरिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जेष्ठ नेते दिलीप (दादा) भिसे यांनी शेतकरी संघटनेत अनेक क्रांतिकारी आंदोलने केली.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच त्यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.सध्या ते नॅचरल शुगर रांजणीचे संचालक म्हणून कार्यरत आहे.स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे ते कट्टर समर्थक होते. मुंडे घराण्याचे विश्वासू एक विश्वासू व्यक्ती म्हणून ते सर्वत्र परिचित आहेत.राजकारण समाजकारण करत असताना अनेक गोर गरीबांची कामे त्यांनी मार्गी लावली त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

“राखावी बहुतांचीया अंतरे,भाग्य येतो तद नंतरे” या उक्तीप्रमाणे आपल आयुष्य सर्वांनी सार्थकी लावल पाहिजे असे बोलताना दिलीप भिसे यांनी सांगितले.गोर गरीबांची चांगले कामे करा ,सत्कार्य करा असा सल्लाही वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांना त्यांनी दिला.यावेळी केज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण खोडसे, सौंदना येथील उपसरपंच शिवराज काळदाते, युवा नेते साहील भिसे, ॲड.राघवेंद्र भिसे,सामाजिक कार्यकर्ते रामधन वाहुळे,प्रभाकर चव्हाण,रामभाऊ चव्हाण ग्रा. प सदस्य,पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!