Uncategorized

नुकसान स्थळावर शेतकरी लहू बनसोडे करणार आमरण उपोषण

केज :- दत्तात्रय मुजमुले

तालुक्यातील मौजे पाथरा येथील दलित शेतकरी लहू महादेव बनसोडे यांनी आपल्या शेतातील सोयाबीनचे पीक काढून एकत्र गंज रचून शेतातच ठेवली असताना अज्ञातांनी त्यांच्या सोयाबीनच्या गंजीला आग लावून मोठ्या प्रमाणात नुकसान केले यातील आरोपीचा अद्याप पोलिसांनी शोध न लावल्याने पीडित शेतकरी बनसोडे हे कुटूंबासह सोयाबीन जळालेल्या ठिकाणी २७ डिसेंबर रोजी उपोषण करणार असून त्याचे निवेदन त्यांनी तहसीलदार यांना दिले आहे.

मौजे पाथरा ता केज येथील दलित शेतकरी लहू महादेव बनसोडे हे गेली १९९८ पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर अनु.जाती निवासी आश्रम शाळा चालवतात आणि ते कुटूंबासह त्याच ठिकाणी राहतात त्यांच्या शाळेच्या पाठीमागे दत्तात्रय संस्थान अंबाजोगाई यांच्या नावावर असलेल्या एकूण जमिनी पैकी त्यांचे सासरे केशव महादेव जोगदंड यांच्या हिश्याची शेती सर्वे न १०२ मध्ये जमीन असून ती वहिती करीत आहेत. यावर्षी या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती आणि शाळेच्या पाठीमागील बाजूस सोयाबीनची गंज लावली होती ती दि.17 ऑक्टोबर 2023 रोजी अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली.

त्या तक्रारीची आजवर कसल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने सोयाबीन जळालेल्या ठिकाणीच 27 डिसेंबर पासून आमरण उपोषणाला बसणार आहेत.सोयाबीन पिकाची गंज जळालेल्या आरोपींना तत्काळ अटक करून सोयाबीनची नुकसान भरपाई मिळावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!