श्रीकांत गदळे यांनी केली विधान परिषद आमदारकीची मा.राज्यपालांकडे मागणी

श्रीकांत गदळे यांनी केली विधान परिषद आमदारकीची मा.राज्यपालांकडे मागणी
केज:- दत्तात्रय मुजमुले
तालुक्यातील दहिफळ ( वडमाऊली) येथील रहीवाशी असलेले श्रीकांत विष्णु गदळे हे विविध कारणाने नेहमी चर्चेत असतात.या आगोदर नुकतेच त्यांनी ठाकरे सरकार अस्थिर दिसत असताना त्यांनी मला प्रभारी मुख्यमंत्री करा अशी मागणी मा.राज्यपाल महोदय यांच्याकडे केली होती.आणि आता त्यांनी मा.राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर राज्यपाल महोदयांच्या कोठयातुन सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेवर आमदारकी मिळावी अशी मागणी मा.जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मा.राज्यपाल महोदय यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रीकांत विष्णु गदळे यांनी मा.जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मा.राज्यपाल महोदय यांना पत्र पाठवले असून त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की, ते गेल्या 10 ते 12 वर्षापासून समाजकारणा मध्ये अग्रेसर आहे. गेल्या 10 ते 12 वर्षीपासून राज्यामध्ये शेतकरी , कष्टकरी जनता तसेच सर्व सामान्य जनता यांच्या प्रश्नावर सातत्याने काम करत आहे .परंतु सध्या काम करत असतांना माझ्याकडे कसल्याही प्रकारचे पद नसल्यामुळे मला सर्व सामान्य जनतेचे व शेतकरी , शेतमजुर तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मला खूप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे . त्यामुळे मा.राज्यपाल महोदयांनी कामाचा अनुभव लक्षात घेऊन शासकीय कोठ्यातून शेतकरी वर्ग सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विधान परीषदेवर आमदारकी विनंती पत्राद्वारे केली आहे