मनोज जरांगे पाटील यांच्या सभा स्थळाचे भूमिपूजन संपन्न

केेज :- दत्तात्रय मुजमुले
तालुक्यातील मौजे बोरीसावरगाव येथे क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणा निमित्त भव्य महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा.ही भव्य महासभा होणार असून त्या अनुषंगाने बोरी सावरगाव ते बनसारोळा रस्त्यालगत 100 एकर जागेचे नियोजन करण्यात आले. त्या जागेतील शेतातील उभे पीक नष्ट करून मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी जागा उपलब्ध करून दिली जात आहे. आज या सभा स्थळाचे सकल मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.
या महासभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या केज च्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रत्येक गावातील सकल मराठा बांधवांनी आपापले मतभेद विसरून सर्व सकल मराठा समाज प्रेमी,तरुण युवक,नागरीक,महिला,तरुण तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हक्काच्या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट:- मनोज जरांगे पाटील यांची सभा आमच्या शेतात घेणे हे आमचे भाग्य समजतो.त्यांच्या पदस्पर्शाने आमची जमीन पावन होईल .तालुक्यातील सर्व जनतेने या सभेसाठी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन हणुमंत मुळे,चंद्रकांत मुळे,धनराज मुळे यांनी केले आहे.