प्रचंड जन समुदायाच्या उपस्थितीत अण्णा बनसोडे यांचा पिंपरी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल

“सोबत असलेल्या लोकांची गर्दी पाहून, माझ्या महाविजयाची नांदीच आहे असं वाटतंय” _ अण्णा बनसोडे
सांगावा, पिंपरी. दि. २९ : उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत विविध पक्ष आणि संघटनाच्या उमेदवारांमध्ये चालू असलेल्या झुंबड गर्दीमध्ये पिंपरी मतदार संघावर प्रमुख दावेदार असलेले आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री अण्णा हजारे यांनी २८ तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
” खंबीर साथ जनतेची, नांदी ऐतिहासिक महाविजयाची ” या शीर्षकाखाली आज आणा बनसोडे यांनी आपल्या भावना व्यक्त सोशल मध्येमंवर पोस्ट करीत व्यक्त केल्या.
” दिनांक सोमवार २८ ऑक्टोबर रोजी अथांग जनसागराच्या साक्षीने पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने आयोजित भव्य नामांकन रॅलीस व महाविजय संकल्प सभेस लोटलेला अलोट जनसागर, जनतेचे उदंड प्रेम व अभूतपूर्व उत्साह पाहून मी अक्षरशः भारावून गेलो. जणू ही मी केलेल्या विकासकामांची पावती व ऐतिहासिक महाविजयाची नांदीच होती. या ऐतेहासिक क्षणी नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रेम, आशीर्वाद , पाठिंबा दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. नेहमी स्नेह असाच कायम ठेवून आपण सर्वांनी खंबीर साथ द्यावी, आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि पाठबळावर पिंपरी मतदारसंघात प्रगतीचे पर्व आणून जनतेच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे”
__ अण्णा बनसोडे ( महायुतीचे उमेदवार : पिंपरी विधानसभा मतदारसंघ )