राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने मूकनायक दीन साजरा

केज | प्रतिनिधी
मूकनायक या पाक्षिकाचा वर्धापण दिन हा मूकनायक दिन म्हणून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या केज शाखेच्या वतीने साजरा करण्यात आला.
केज येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार आर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार रणजित घाडगे, पत्रकार दत्तात्रय मुजमुले, पत्रकार अनिल वैरागे, पत्रकार दिनकर जाधव, पत्रकार अमोल सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.मूकनायक हे भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते.
दि.३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे. महाराष्ट्रातील जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीच समजू शकत होती. या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता.