Uncategorized

त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी.

केज :- तालुक्यातील युसूफवडगांव येथील भिमनगरमधील महिलांनी एकत्र येत विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सावली बहुजनांची आई माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा केली.

प्रज्ञासुर्याची सावली अर्थात दिनदलितांची माऊली विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धांगिनी त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त युसूफवडगांव येथील भिमनगरमध्ये त्यांना वंदन करण्यासाठी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी ग्रा.प.सदस्य सौ.संध्या लांडगे व आशा कार्यकर्त्या सुनिता निशिगंध यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन वंदन करण्यात आले.

यावेळी आम्रपाली बचुटे,अनुराधा सातपुते,पुनम सातपुते,माया उजगरे, सुवर्णा सातपुते,सिता निशिगंध,ज्योती लांडगे,सुप्रिया लोंढे,दिक्षा लांडगे,स्वाती सातपुते,मिराबाई सातपुते, मंदाकिनी उजगरे,रमा निशिगंध,काजल निशिगंध,कल्पना लांडगे,चंद्रकांता निशिगंध,प्राजक्ता निशिगंध,वच्छालाबाई लोंढे,राणी लोंढे,मनिषा बचुटे,लक्ष्मी निशिगंध,रजनी निशिगंध या महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!