Uncategorized

नांदुरफाटा येथील निवासी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी

बीड :- प्रतिनिधी

जिल्ह्यातील नांदूर फाटा येथील आदर्श मतिमंद निवासी शाळेतील सुमित संजय पाटील या मतिमंद मुलाचा जीव गेला या प्रकरणात शाळेची चौकशी करण्याची मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ.जितेंद्र ओव्हाळ यांनी शुक्रवारी समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे केली.

या बाबतीत डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी सांगितले की,सुमित पाटील या विद्यार्थ्यांचा जीव बुधवारी गेला आहे. पोलिसांनी काय चौकशी केली ? शाळा निवासी असताना शाळेतील कर्मचारी कुठे होते ? असे अनेक प्रश्न उपस्थित करत मतिमंद मूलांची या शाळेत काय व्यवस्था होती सुमित पाटील या विद्यार्थ्यांचा जीव कोणत्या कारणामुळे गेला ? याची चौकशी दोन दिवसात करा पोस्टमाँर्टम रिपोर्ट नुसार पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ.जितेंद्र ओव्हाळ यांनी शुक्रवारी दिला.

बुधवार दिनांक ३०ऑगस्ट २०२३ रोजी आदर्श मतिमंद विद्यालयाचा विद्यार्थी सुमित संजय पाटील रा.मांडवा ता. वाशी जि.धाराशिव हा विद्यार्थी आदर्श मतिमंद विद्यालयात शिक्षण घेत होता परंतु याचा अचानक मृत्यू कोणत्या कारणाने झाला ? याची सखोल चौकशी व्हावी व त्याच्या आई-वडिलांना पन्नास लाखाची मदत द्यावी अशी मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ.जितेंद्रओव्हाळ यांनी केले आहे. तसेच आदर्श मतिमंद विद्यालयावर नेकनूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी तीव्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे .या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही तीव्र असे आंदोलन छेडू असा इशारा ही दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!