माजी आमदार पृथ्वीराज साठेंचे शरद पवारांना समर्थन

बीड /प्रतिनिधी
राज्याच्या राजकरणात झालेली उलटापालट हाच विषय सध्या जोरदार चर्चेत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी अचानक शिंदे,फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मोठी फूट पडली आणि त्यामध्ये अजित दादा पवारांचा एक गट निर्माण झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडल्यानंतर अनेक आमदार, खासदार,पदाधिकारी अजित पवारांबरोबर गेले तर काही आमदार खासदार पदाधिकारी यांनी शरद पवार यांच्याबरोबर जाणं पसंत केले. त्यानंतर पक्षांमध्ये मोठी फूट पडल्याचे दिसून येत असून अनेक आमदार,खासदार,पदाधिकारी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष असणारे शरद पवारांच्या सोबत आहेत तर काहींनी अजित पवारांचे समर्थन केले आहे. त्यातच बीड जिल्ह्यातील आमदार,पदाधिकारी आपापली भूमिका स्पष्ट करत आहेत.
त्यामध्ये केज विधानसभेचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत अशी सोशल मीडियावर पोष्ट करत शरद पवारांच्या सोबत असल्याचे सांगितले आहे.मुंबई येथील सिल्वर ओक या शरदचंद्रजी पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन साहेबांसोबतचा फोटो माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे.त्यावेळी राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व इतर दिसत आहेत.