केज तालुकाध्यक्ष पदावर निवडीने सर्व स्तरातून स्वागत

केज :- दत्तात्रय मुजमुले
केज तालुक्यातील स्वाभिमानी पञकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राजयोगचे तालुका प्रतिनिधी पञकार चंद्रकांत पाटील यांची भारतीय नरेंद्र मोदी संघाच्याकेज तालुकाध्यक्ष पदावर निवड भारतीय नरेंद्र मोदी संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री.भाऊसाहेब घोडके यांनी केली आहे.पञकारीता क्षेञासह सामाजिक कार्यात केलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.
त्यांनी दिलेल्या नियुक्तीपञामध्ये श्री.चंद्रकांत पुरुषोत्तमराव पाटील रा. केज ता.केंज जि.बीड.आपल्याला कळविण्यात अत्यानंद होत आहे की,भारतीय नरेंद्र मोदी संघ (बी.एन. एम.एस) सामाजीक संगठन मध्ये आपणास केज तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात येत आहे ही नियुक्ती आज पासुन पुढील २ वर्षापर्यंत मान्य राहील.आम्हास पूर्ण पणे विश्वास आहे,की, आपण या सामाजिक सघटनेसाठी तन, मन, धनाने निष्ठापूर्वक अथक परिश्रम घेवुन ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल असा मला विश्वास आहे.आपल्या भावी कार्यास माझ्या मनः पुर्वक शुभेच्छा…!श्री.भाऊसाहेब घोडके
महाराष्ट्र अध्यक्ष,भारतीय नरेंद्र मोदी संघ यांनी दिलेल्या नियुक्ती पञात म्हटले आहे.दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी श्री.भाऊसाहेब घोडके महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र मोदी संघ यांचे आभार मानले असुन संघटनेने सोपवलेली जबाबदारी निष्ठापुर्वक व जबाबदारी ची जाणीव ठेऊन पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.