Uncategorized

मतदार जनजागृती अंतर्गत सायकल रॅली !

केज :- येथे दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी तहसील कार्यालय केज ,येथे मा. जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप प्रोग्राम अंतर्गत सायकल रॅली आयोजीत करण्यांत आलेली होती.

सदर स्पर्धेमध्ये सरस्वती कन्या प्रशाला केज, वि.दा. कराड वि. केज, सानेगुरुजी निवासी प्रा.वि. केज, स्वामी विवेकानंद वि. केज, या शाळेतील विद्याथ्यांनी सायकल रॅली मध्ये सहभाग नोंदवला. सदर उपक्रमांस श्री. दिपक वंजाळे सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले. तसेच श्री. अभिजित जगताप तहसीलदार,केज व श्री. लक्ष्मण बेडस्कर, गट शिक्षणाधिकारी, केज यांनी मतदान करण्याविषयी आवाहन केले.

यावेळी श्री. बेडसकर गटशिक्षणाधिकारी ,केज यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या स्वीप उपक्रमांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमांस कार्यालयीन कर्मचारी व शिक्षक यांचा मोठा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!