जिल्ह्यातील परिवर्तनाची सुरुवात याच लोकसभा निवडणुकीतून होणार – बबन गित्ते

बीड / परळी :-
बीड जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी वर्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, दरडोई उत्पन्नात प्रचंड प्रमाणात घट झालेली असून, त्याच्या तुलनेत महागाई दुप्पट वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य माणूस आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांनी जिल्ह्याचा अजिबात विकास केला नाही. जिथेतिथे भ्रष्टाचार बोकाळला असून, हे सर्व थांबवायचे असेल आणि जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर आणायचे असेल तर जिल्ह्यात परिवर्तन घडून येणे महत्त्वाचे आहे. याची सुरुवात याच लोकसभा निवडणुकीतून होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन भाऊ गित्ते यांनी केले.
महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ त्यांनी परळी शहरातील विविध भागांतील मतदारांशी घरोघरी जाऊन संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन भाऊ गित्ते यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांचा परळी शहरात जोरदार प्रचार सुरू आहे. शहराच्या विविध भागांत जाऊन ते मतदारांच्या व्यक्तिशः भेटीगाठी घेत आहेत. नागरिकांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, बजरंग बप्पांना सर्वाधिक मताधिक्य परळी शहरातून मिळणार आहे. रविवारी परळी शहरातील गानेशपार, नांदूर वेस, बंगला गल्ली, देशमुख गल्ली, सरकार वाडा, गोपनपाळे गल्ली, अंबेवेस आदी भागांत प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते नारायण सातपुते, शहर प्रमुख राजेश विभुते, तालुका प्रमुख भोजराज पालीवाल, तालुका उपप्रमुख महेश केंद्रे, सचिव प्रकाश साळुंके, संघटक सतीश जगताप, समन्वयक भरत इंगळे, जगन्नाथ साळुंके, आपचे शहर प्रमुख व त्यांचे सर्व कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, शहर अध्यक्ष जीवनराव देशमुख, युवक अध्यक्ष शंकर शेजुळ, काँग्रेस शहर अध्यक्ष बहादुर भाई, आंतरराष्ट्रीय मानवाधिकारचे अध्यक्ष जमील अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस प्रकाश मुंडे, कार्य अध्यक्ष शशीशेखर चौधरी, उपाध्यक्ष सुभाष देशमुख, अँड.प्रकाश मुंडे, अँड.सतीश देशमुख, भगवान कदम, इतेशाम खतीब, युवक विधानसभा अध्यक्ष रणजित देशमुख, अलीम भाई, फिरोज सैय्यद, मेहबूब कुरेशी, रमेश चौंडे, जेष्ठ नेते गुलाबराव देवकर, अनुसुचित जाती-जमाती अध्यक्ष दीपक शिरसाट, ओबीसी अध्यक्ष जावेद भाई, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष रसूल खान, तालुका अध्यक्ष सद्दाम भाई, बद्दर भाई, अल्ताफ भाई, सियम, लखन सुरवसे, नवनीत संघई, संतोष साखरे, विशाल गावडे, मनोज गित्ते, रेखा लक्ष्मण जानराव, महिला आघाडी अध्यक्ष दिपाली सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती.