Uncategorized

दलित अन्याय अत्याचार निर्मुलन समिती करणार समता मोटर सायकल रॅली चे आयोजन

*दलित अन्याय अत्याचार निर्मुलन समिती करणार समता मोटर सायकल रॅली चे आयोजन*

बाबासाहेबांचे समतेचा विचार घरोघरी पोहचविण्यासाठी समतेची रॅली

केज – दत्तात्रय मुजमुले

दलीत अन्याय अत्याचार निर्मुलन समिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्याप जयंतीनिमित्त मोटर सायकल रॅली आयोजित करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीनुसार समता बंधुता एकता हा वसा हाती घेऊन केज तालुक्यातील सर्व भीमसैनिक मिळून केज शहरात भव्य दिव्य अशी समता मोटरसायकल रॅली आयोजित करीत आहे तरी केज शहरातील व तालुक्यातील सर्व भीमसैनिकांना आवाहन करण्यात येत आहे, येणाऱ्या 13 एप्रिल सकाळी दहा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, केज येथून मोटर सायकल रॅलीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात होणार आहे तरी सर्व भीमसैनिकांनी बाबासाहेबांनी दिलेला समतेचा उपदेश प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी या रॅलीसाठी उपस्थित रहावे असे दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष रोहित कसबे,उपाध्यक्ष सुदेश दादा सिरसट, सदस्य लखन हजारे, सुमित बप्पा शिंदे, योगेश गायकवाड, अशोक गायकवाड, अजय भांगे, प्रवीण मस्के यांनी आवाहन केले आहे तरी सर्वांनी 13 एप्रिल रोजी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!