Uncategorized
अखेर इस्थळ गाव आठ दिवसानंतर उजेडात !

केज :- तालुक्यातील मौजे इस्थळ येथील डीपी जळाल्याने गेल्या आठवडाभरापासून अर्धे गाव अंधारात होते.त्यामुळे पुनश्च एकदा महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला होता.त्यामुळे गावातील नागरिक महिला आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असताना आमदार सौ नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नातून डिपी मंजूर करून देण्यात आले.
गेल्या आठवडाभरापासून अर्धे गाव अंधारात आहे ही बाब लक्षात येताच आमदार सौ नामिताताई मुंदडा यांनी डीपी उपलब्ध करून दिल्याने गावकऱ्यांकडून आमदार सौ नमिताताई मुंदडा यांचे आभार मानण्यात येत आहेत.