मणिपूर येथील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड येथे निषेध आंदोलन

(पिंपरी दि. 25)वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मणिपूर येथील महिलांवर झालेल्या अमानवी अत्याचाराच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोर निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना सर्वजित बनसोडे म्हणाले की मणिपूर येथील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. सर्व देशभरामध्ये या घटनेचा निषेध नोंदवत असताना . या घटनेवर संसदेत चर्चा करायला भाजप सरकार तयार नाही. यासर्व घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे असे बनसोडे म्हणाले.
आपल्या भारत देशामध्ये गाईला जर कोणी दगड मारला तर दंडात्मक शिक्षा दिली जाते. मनिपुर मध्ये आपल्या आई बहिणीला नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली. या घटनेमुळे देशाला कलंक लागला आहे, मनिपुर सरकारचा व भाजप सरकारचा जाहीर निषेध मनिपुर येथील पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा असे शिवाजी खडसे म्हणाले
या आंदोलनाला उपस्थित वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे, वंचित बहुजन महिला आघाडी प्रदेश सचिव अनिताताई सावळे, पिंपरी चिंचवड शहर महासचिव संजीवन कांबळे भोसरी विधानसभा अध्यक्ष अनिल शेठ भारती पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष विकी तमचिकर सचिव राजू साळवे सचिव विजुभाऊ ओव्हाळ उपाध्यक्ष धनंजय कांबळे सचिव बाळासाहेब शिवशरण शहर संघटक सतीश गायकवाड भोसरी विधानसभा महासचिव भैय्यासाहेब ठोकळ शाखाध्यक्ष गजेंद्र जी कांबळे शाखाध्यक्ष शिवाजी खडसे शाखाध्यक्ष सचिन ओव्हाळ शाखाध्यक्ष विशाल धुळधुळे काळेवाडी शाखा सचिव नितीन मोटे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.