Uncategorized

जातीवादी वाचाळविराला अटक करण्याची मागणी

पुणे :- प्रतिनिधी

दिलीप जाधव रा. लातुर या जातीवादी वाचाळविराने फेसबुकव्दारे बौध्द महीलांना व बौद्ध बांधवाना जातीवाचक शिवीगाळी केल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी दापोली येथील दापोली येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने निवेनाद्वारे करण्यात आली आहे.

दिलीप जाधव रा. लातुर या जातीवादी ईसमाने एक व्ही.डी.ओ. बनवुन त्यामध्ये बौध्दांना व त्यांच्या महीलांना अश्लील जातीवाचक शिवीगाळी करून समाजात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळी करून अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा केलेला आहे. तरी सदर ईसमांने फेसबुकवर केलेल्या व्ही.डी.ओ. ची सत्यता पडताळुन व त्या कामी तपासकाम होऊन संबंधीतावर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी ही मागणी दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनावर प्रीतम लक्ष्मण रुके ( जिल्हाध्यक्ष ),अनिल गुणाजी जाधव ( दापोली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष),चरणदास मर्चांडे (बौ.से.संघ अध्यक्ष),उमेश पवार (जिल्हा युवा संघटक),वीरेंद्र मोरे (मा.युवा अध्यक्ष) यांच्यासह इतरांच्या स्वाक्षरी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!