पिंपरी चिंचवड शहर महिला राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीची आढावा बैठक गुरुवार दि १९ रोजी संपन्न झाली.

पिंपरी:- २० ऑक्टोंबर २०२३
लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब कार्याध्यक्ष संसद रत्न सुप्रियाताई सुळे महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई खडसे शहराध्यक्ष तुषार भाऊ कामठे यांच्या मार्गदर्शनात पिंपरी चिंचवड शहर महिला राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीची आढावा बैठक गुरुवार दि १९ रोजी संपन्न झाली.
आदरणिय शरद पवार साहेबांच्या विचारांशी बांधिलकी जपत सर्व महिला ठाम पणे पवार साहेबांच्या पाठीशी उभ्या आहेत. महागाई, बेरोजगारी, गॅस दरवाढ करणाऱ्या भाजपा सरकारला हद्दपार करू असे मत महिलांनी व्यक्त केले.
नवरात्री निमित्त विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, साहित्य, पोलीस प्रशासनातील, बचत गटांमार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या या सर्वच क्षेत्रातील महिलांना तूच दुर्गा, तू भवानी, आदिशक्ती, रणरागिणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पोलीस प्रशासना मार्फत महत्त्वाची भूमिका मांडणाऱ्या श्रद्धा बरगुडे मॅडम, साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या समरसता साहित्य परिषदेच्या शोभाताई जोशी, शासनाने दिलेल्या कामाव्यतिरिक्त देखील इतर अनेक योजनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तालेरा हॉस्पिटल मधील सुनिता सिस्टर, शेख सिस्टर, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या सुप्रिया जगताप, किरण लोंढे, क्रांतिवीर चाफेकर समितीच्या कार्यक्षम शिक्षिका पुष्पाताई जाधव, जनतेची सेवा करणाऱ्या आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवणाऱ्या संगीता कांबळे, अनिता शिंदे शीतल मलकेक या महिलांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पश्चिम विभागाच्या अध्यक्ष सौ भारतीताई शेवाळे. पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा, ज्योतीताई निंबाळकर , चिंचवड शहर कार्याध्यक्ष शारदाताई चोकशी, भोसरी विधानसभा अध्यक्षा पूजा आल्हाट, चिंचवड विधानसभा अध्यक्षा स्वप्नाली आसोले, माजी नगरसेविका जनाबाई जाधव माजी उपमहापौर विश्रांतीताई पाडळे, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष सुवर्णा वाळके भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष सारिका हरगुडे, वरिष्ठ मार्गदर्शक ad. प्रिया देशमुख ज्योती लांडगे, पंचशीला आगळे, रेखा मोरे सर्व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विभागीय अध्यक्ष भारतीताई शेवाळे मार्गदर्शक विश्रांती ताई पाडाळे व जनाबाई जाधव यांच्या हस्ते अनेक महिला पदाधिकाऱ्यांना पद वाटप झाले.

पुणे जिल्हा विभागीय अध्यक्षा भारती शेवाळे म्हणाल्या की, "'आज ज्या पद्धतीने भाजप सरकारने खोट्या योजनांचं अमिष दाखवून जनतेला फसवलेल आहे ही फसवणूक आपण पुसून काढली पाहिजे त्यांच्या उज्वला गॅस सारख्या योजना ज्या पूर्णपणे डब्यात गेल्या आहेत त्या आपण त्यांना दाखवून दिल्या पाहिजेत अनेक मोठी मोठी आश्वासन या सरकारने आपल्याला दिली त्यातलं कोणतेही आश्वासन सरकार पूर्ण करू शकलेलं नाही महिलांचं आरक्षण जरी 50% केलं असलं तरी तो कायदा 2028 नंतर अमलात येणार आहे तेव्हा येईल की नाही याची देखील शाश्वती नाही म्हणजे पूर्णपणे फसवणुकीचा एक धंदा त्यांनी मांडलेला आहे त्यासाठी पदर खोचून महिलांनी आता प्रत्येक गोष्टीचा विरोध करण्यासाठी पुढे आले पाहिजे स्वतःच्या हक्कांसाठी लढले पाहिजे प्रदेश वरून आलेले उपक्रम महिलांना व्यवस्थित समजावून सांगितले व आगामी काळात होणाऱ्या संसद रत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या महिला मेळाव्याचे नियोजन करण्यात आले".
महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर म्हणाल्या, "ज्या परिस्थितीत आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस सुरुवातीला पाच महिलांनी आम्ही सुरुवात केलेली आहे 95 टक्के महिला या दादांच्या गटात असताना देखील आम्ही घाबरलो नाही डगमगलो नाही आणि साहेबांच्या बाजूनेच ठाम राहण्याचा निर्णय घेतला प्रदेशाध्यक्षांनी दिलेली ही जबाबदारी अंगा खांद्यावर पेलून पूर्ण सामर्थ्यानिशी आम्ही आज मैदानात उतरलेला आहोत महिलांचे संघटन पाच महिलांपासून पाचशे महिला पर्यंत करण्याचं त्यांना आश्वासन दिले त्याच पद्धतीत वेगवेगळे उपक्रम असतील आंदोलन असतील किंवा पालिकेतील भ्रष्टाचार वाढती महागाई वाढते गॅस दर या सर्वांचा विरोध महिला पदाधिकाऱ्यांच्या मार्फत जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम नक्कीच करण्यात येईल"
कार्याध्यक्ष सुवर्णताई वाळके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व कार्याध्यक्षा शारदा चोकशी काटे यांनी आभार मानले.