राजकीय

कंत्राटी भरती आदेश रद्द राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा कर्मचारी वर्गासह आनंदोत्सव साजरा.

कंत्राटी भरती आदेश रद्द केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन !

पिंपरी (प्रतिनिधी)

राज्यात सुरु झालेला कंत्राटी भरती रद्द रद्द केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रीय श्रमिक आघाडी च्या वतीने मी अभिनंदन करतो असे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी परिषदेत परिषदेत व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात शासकीय कार्यालयामध्ये कंत्राटी कामगार भरण्यासाठी राज्य सरकार तर्फे आदेश काढण्यात आला होता. या आदेशामुळे राज्यात विशेषतः तरुण बेरोजगार मंडळीमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. अनेक कामगार संघटना रस्त्यावर आंदोलने करित होती.

राष्ट्रीय श्रमिक आघाडी तर्फे न्यायालयात याचिका दाखल केली होती. कंत्राटी कामगार भरती प्रकरणी राज्यातील रोस पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदरील आदेश रद्द करित असल्याचे जाहीर केल्याने राज्यभर कामगार वर्गात आनंद व्यक्त केला गेला.

राष्ट्रीय श्रमिक आघाडी च्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले असल्याची माहिती श्रमिक आघाडी चे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी आज झालेल्या पिंपरी येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!