Uncategorized

कानेगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा

लोहारा :
लोहारा तालुक्यातील
मौजे कानेगांव ता. लोहारा येथील ग्रार्मावकास अधिकारी श्री. एस.डी. जगदाळे, हे रजेवर गेल्यामुळे त्याठिकाणी श्री. एम.एस. भिल्ल यांची नियुक्ती केली आहे भिल्ल हे ग्रामपंचायत सदस्यांना तसेच ग्रामस्थांना उद्धटपणाचे वागणूक देऊन उद्धट भाषा बोलतात त्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी कानेगाव ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी लोहारा यांच्याकडे केली आहे दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की श्री. एम.एस. भिल्ल यांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी त्यांच्या ऐवजी अन्य ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी हि विनंती. याआगोदर पंचायत समिती कार्यालयास दि. 14/05/2024 रोजी पत्र देऊन ही आजपर्यंत मागणीचा विचार केला नाही. तसेच दिनांक 28/05/2024 रोजी उपसरपंच यांच्या अध्यक्षतेखाली नियमबाह्य बैठक बोलवली होती या बैठकीला ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य उपस्थित होते. 13 सदस्यापैकी 9 सदस्याचा या बैठकीला विरोध होता तसे बैठक सुरु होण्याच्या अगोदर ग्रामविकास अधिकारी यांना पत्र सुद्धा दिले होते. तरी सुद्धा ग्रामविकास अधिकारी यांनी उद्धट भाषा वापरुन बैठक घेतली व उपस्थित रजिस्टरवर 4 सदस्यांच्या सह्या घेतल्या आणि दप्तर उपसरपंच यांच्या घरी घेऊन जाऊन प्रोसिडींग लिहिली. त्यामुळे या दोन्ही मागणीचा तात्काळ विचार करण्यात यावा. अन्येथा दिनांक. 05/06/2024 रोजी वार बुधवार पासुन संपुर्ण ग्रामस्थ व ग्राम पंचायत सदस्य यांच्यासह आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा कानेगाव येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय लोहारा येथे दिला आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य नामदेव लोभे बालाजी लोभे, नवनाथ भारती, बाळू शिरसागर, यशवंत माने, सौ, शकुंतला कदम सौ सुप्रिया अडसुळे, सौ सावित्रीबाई श्रीगिरे श्रीमती सुनिता कांबळे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!